तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापनामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल –दत्तात्रय भरणे

पालकमंत्री दत्तात्रय भरणे

वडवळ येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप

सोलापूर– येणारा काळ शेतकऱ्यांचा असेलशेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानपीक पद्धती आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात आढावा बैठक संपन्न

वडवळ (ता. मोहोळ) येथील भक्त निवासात कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताह शुभारंभप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तहसीलदार जीवन बनसोडे, सभापती रत्नमाला पोतदारजि.प. सदस्य तानाजी खताळदेवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे, उपसरपंच धनाजी चव्हाणगटविकास अधिकारी अजिंक्य येळेमृद शास्त्र विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ बी. एस. कदम, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या बांधावर – बाळासाहेब पाटील

श्री. भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषिमंत्रीआयुक्तअधिकारी बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेतत्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. मात्र पीक पद्धतीउसाच्या नवीन पद्धतीचा अभ्यास करून योग्य लागवड केली तर याचा फायदा होत आहे. उत्पन्न व बाजारपेठा पाहून नवनवीन प्रयोगाने पीक लागवड करा. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे असून नवीन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.

शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

यावेळी त्यांनी बनावट खते किंवा उगवत नसलेल्या बियाण्यांच्या तक्रारीबाबत कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. येणारे 25 दिवस कोरोनामुळे खूप धोक्याचे आहेत.गरज असेल तरच शहरात जावा. कोरोनाला घाबरू नका पण योग्य काळजी घ्या. एकत्र जमू नकामास्कचा वापरसाबणाने स्वच्छ हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना खतेबी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

youtube.com/watch?v=KGc_pusSKmM

महत्वाच्या बातम्या –

चक्क कृषिमंत्र्यांनी धरले शेतकरी जोडप्याचे पाय; शेतकरी कुटुंबही भारावले

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘डोअर टू डोअर’ तपासणी करा – छगन भुजबळ