राज्यत थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढलेला पाहायला मिळत आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य भागात सुद्धा तापमानाचा पारा चांगलाच खाली घसरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निफाडमध्ये काल म्हणजेच २९ जानेवारी रोजी ६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २४ तासांतच निफाडचा पारा तब्बल ५ अंशाने खाली आला आहे. येत्या २४ तास मध्य महाराष्ट्र गारठलेलाच असणार अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.
पुण्याचा पारा पाेहचला 10 अंशावर
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाडचा पारा घसरला आहे. उत्तरेकडून वाहणारे वारे हे थंड आणि शुष्क असून हवेतील आद्रता ५० टक्के कमी असल्यामुळे सध्या थंडावा जाणवत असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं.
शासकीय कापूस खरेदी दहा दिवसापासून बंद
थंड वाऱ्यामुळे गारठा निर्माण झाल्याने या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे. मुंबईतही थंडीचा जोर वाढला असून हवेत थंडावा आहे. आगामी तीन दिवस मुंबईतील हवेत असाच थंडावा जाणवण्याची शक्यता आहे. आगामी दोन दिवसात मुंबईतील हवामान १६ ते १८ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.
‘सीएए’ चा राज्यातील नागरिकाला त्रास होऊ देणार नाही – अनिल देशमुख https://t.co/ICNKZHCtmz
— Krushi Nama (@krushinama) January 30, 2020