लातूर जिल्ह्यात यंदा तूर खरेदीसाठी उदगीरमधील दोन केंद्रासह दहा केंद्रांना मंजुरी

लातूर जिल्ह्यात यंदा तूर खरेदीसाठी उदगीरमधील दोन केंद्रासह दहा केंद्रांना मंजुरी pigeon pea

लातूर जिल्ह्यात यंदा तूर खरेदीसाठी उदगीरमधील दोन केंद्रासह दहा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रावरून ७५७८ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये अहमदपूर येथील केंद्रावर ८९७, हलसी तुगाव २४८, औसा ९८२, भोपणी ६९८, चाकूर १७७०, लातूर १८१, लोणी उदगीर ३८९, रेणापूर ६१९, शिरूर अनंतपाळ २७१ व उदगीर केंद्रावरील १५२३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दहा केंद्रांना मंजुरी देण्यात आली. या केंद्रावरून ३०६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Realme 5i भारतीय बाजारात लॉन्च

या केंद्रांमध्ये उस्मानाबाद, नळदूर्ग, भूम, वाशी, लोहारा, गुंजोटी, कानेगाव, ढोकी, तुळजापूर, कळंब या केंद्रांचा समावेश आहे. या पैकी उस्मानाबाद केंद्रावर ७६, भूम ७१, गुंजोटी १२९, ढोकी ६, तर कळंब केंद्रावरून २४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असला तरी, प्रत्यक्षात तलाठ्यांकडून सातबारा उताऱ्यावर हंगाम २०१९-२० चार तूर पीक पेरा नसल्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. १ जानेवारीपासून सुरू झालेली नोंदणी १४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.