अनेक गोष्टींत ठाकरे सरकारने फसवणूक केली; या सरकारचा मी धिक्कार करतो – सुभाष देशमुख

सुभाष देशमुख

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकलं जाणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. दोन लाखांपेक्षा वर असलेल्या कर्जदारांसाठी आणि विशेषत: जे नियमित कर्ज फेडत आहेत त्यांच्यासाठी लवकरच योजना जाहीर करून ती अंमलात आणली जाईल अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

नाफेडचा तूर खरेदीस नकार; शेतकऱ्यांना दीड कोटीचा फटका बसणार

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते.त्यावेळी ते बोलत होते की,  ठाकरे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे पण अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. या सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही फसवी असून, दोन लाखांवर एक हजार रुपये थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही, तर नियमितपणे कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांचे काय ? असा प्रश्न माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी केला आहे.

चांगली बातमी ; आता सातबाऱ्यावर होणार चंदनाची नोंद

अतिवृष्टी झाली त्यावेळी उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यावेळी त्यांनी हेक्टरी २५ हजार कोरडवाहूला तर बागायती शेतीला ५0 हजार मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. ते तर शेतकऱ्यांना मिळालेच नाही.

तसेच हे सरकार फक्त आश्वासनाच देते करत मात्र काहीच नाही. अजून एकाही शेतकऱ्याचा  सात-बारा उतारा कोरा झालेला नाही. दोन लाखांच्यावर एक हजाराचेही कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याचे नाव हे कर्जमाफीत बसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अशा ३0 हजार शेतकऱ्याची नावे वगळण्यात आली.

मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार; शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्रथमोपचार – उद्धव ठाकरे

ही एकाच नाही तर अनेक गोष्टींत या सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली असून, ठाकरे सरकारचा मी धिक्कार करतो, शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून विधानसभेत भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांचे हक्क मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही – उद्धव ठाकरे

हापूसने पळवले तोंडचे पाणी; एवढा दर एका आंब्याचा