महिलांसाठी ठाकरे सरकारने ‘हा’ घेतला मोठा निर्णय !

सरकार

मुंबई – काल दिनांक २८ मे..  ‘मासिक पाळी’ स्वछता दिन हा दिवस महिलांना स्वछतेचे महत्व समजावे जागृतीसाठी हा दिवस पाळला जातो, मासिक पाळीत मुख्य घटक हा सॅनिटरी पॅड असतो. परंतु सर्व महिलांना ते घेणे परवडत नाही पैश्याची कमतरता असते, म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल महत्वाची घोषणा केली राज्यातील महिलांना आता फक्त १ रुपयात सॅनिटरी पॅड मिळणार आहेत. ह्या घोषणेने ठाकरे सरकारने महिलांना आधार देण्याचे काम केले आहे.

राज्य सरकारकडून दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटांच्यामहिलांना १ रुपयात १० सॅनिटरी नॅपकिन देणार आहेत. आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांना या निणर्याचा आरोग्य दृष्टीने फायदा होणार असून. या योजनेसाठी २०० कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली आहे. तसेच मुश्रीफ म्हणले कि, ‘ राज्यभरातील ६० लाख महिलांचा आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. तसेच हा निणर्य १५ ऑगस्ट पासून लागू करण्यात येईल असे हि ते म्हणाले .

महत्वाच्या बातम्या –