बुजगावणे पाहण्यात अनेक पिढ्या खपल्या मात्र असा नजारा विरळाच

मुंबई / नांदेड : शेतकरी आत्महत्यांमुळे महाराष्ट्र देशभरात चर्चेचा विषय आहे. परंतु, ‘व्यक्ती-सृष्टी-समाज’ हा सिंद्धांत प्रतिपादीत करणा-या भारतीय संस्कृतीचे बिजारोपण करूननांदेड जिल्ह्यातील एका शेतक-याने अनोखे उदाहरण प्रस्थापित केले आहे. बालाजी जाधव या शेतक-याने आपल्या दोन एकर शेतात केवळ पक्ष्यांसाठी धान्य पेरले आहेत.

बालाजी यांनी केवळ पशुपक्ष्यांसाठी आपल्या शेतात ज्वारी आणि मका पेरला आहे. यातुन आलेला चारा गुरांसाठी वापरला जातो तर पिकाला आलेले संपूर्ण धान्य केवळ पक्ष्यांसाठी ठेवण्यात येते. आजवर पक्ष्यांना हाकलण्यासाठी शेतात उभारले जाणारे बुजगावणे पाहण्यात अनेक पिढ्या खपल्यात. परंतु, जाधव यांनी केवळ पक्ष्यांसाठी धान्य पेरून माणुसकीचा वेगळा आदर्श प्रस्थापित केला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.