उद्या ‘भारत बंद’ मध्ये राज्यातील ‘या’ ५ मोठया बाजार समित्या राहणार बंद

बाजार समित्या

मुंबई – केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

यापार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार व व्यापा-यांचा मंगळवार 08 डिसेंबर रोजी संप असणार आहे. इतकंच नाही तर उद्या ‘भारत बंद’मध्ये मुंबई, नवी मुंबई, तुर्भे इथल्या 5 बाजार समित्या बंद असणार आहेत.

दरम्यान, पुणे, नाशिक एपीएमसी, यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी होणार असा संबंधित बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –