शेतकऱ्याला लुटणारे आरोपी अवघ्या १२ तासात जेरबंद

शेतकऱ्याला लुटणारे आरोपी अवघ्या १२ तासात जेरबंद crime

शेतकऱ्याला लुटणाऱ्या एका कुख्यात गुंडाच्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या १२ तासात छडा लावला. भिलगाव येथील शेतकरी अरुण कवडूजी महाकाळकर पहाटेच शेतात जाऊन भाजीपाला तोडतात आणि तो विकण्यासाठी ते भल्या सकाळी कळमना मार्केटमध्ये पोहचतात. या मध्ये दोघांना अटक करण्यात आली असून, तीन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ते दुचाकीने जात असताना ऑटोमोटिव्ह चौक ते चिखली चौकादरम्यान दोन दुचाकींवर असलेल्या पाच आरोपींनी रोखले. त्यांना चाकूचा धाक दाखवून धक्काबुक्की करीत त्यांच्याकडची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले. लुटमारीमुळे व्यथित झालेल्या अरुण महाकाळकर यांनी कळमना मार्केट गाठले.

खानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर

यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपींचे वर्णन शहरातील अन्य पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. ते ऐकून कोतवाली ठाण्यातील पोलीस पथकाने गुन्हेगाराशी मिळत्याजुळत्या वर्णनाच्या एका संशयिताला काही वेळेतच ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन जरीपटका तसेच खापरखेड्यातील साथीदारांची नावेही सांगितली. त्यानुसार पोलिसांनी आणखी तिघांना ताब्यात घेतले.