गेल्या आठवड्याच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाची ५० रुपयांनी वाढ

गेल्या आठवड्याच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाची ५० रुपयांनी वाढ limbu

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाची सुमारे दोन हजार गोणी आवक झाली होती. या वेळी गोणीला २०० ते ३०० रुपये दर होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाची ५० रुपयांनी वाढ झाली आहे. काही दिवसांनी उसाची रसवंती आणि सरबत व्यवसाय सुरू होतील. त्यानंतर लिंबाची मागणी वाढून दर देखील वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांनी दररोज सुमारे दीड ते दोन हजार गोणींची आवक होऊन, दर प्रतिगोण ४०० रुपयांपर्यंत वाढीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नागपूरमध्ये गेल्या महिन्यात आवक जास्त असल्याने लिंबू उत्पादकांना दर कमी मिळत होते. आता मात्र, आवक घटल्याने लिंबाच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. कळमणा बाजार समितीत लिंबाची आवक गेल्या महिन्यातील १५० क्विंटलवरून गुरुवारी म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० रोजी अवघ्या २० क्विंटलवर पोचली. त्यामुळेच दरही वधारले लिंबाचे व्यवहार २००० ते २५०० रुपये क्विंटलने झाले.

नवी मुंबईच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात(

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० रोजी लिंबाला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबाची आवक बऱ्यापैकी राहिली. शिवाय मागणी असल्याने उठावही चांगला मिळाला. प्रतिक्विंटलला सर्वाधिक २००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० रोजी रोजी लिंबाची आवक ३५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते १७५० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १२५० रुपये होते. सांगली येथील शिवाजी मंडईत गुरुवारी म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० रोजी लिंबाची आवक ३०० पोती आवक झाली असून त्यास प्रति शेकड्यास ३० ते १०० रुपये असा दर मिळाला.अकोला येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० रोजी लिंबाला २०० ते ५५० रुपये प्रतिकट्टा दर मिळाला. लिंबाची १० क्विंटल आवक झाली होती.

बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावली

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० रोजी  सहा क्विंटल लिंबाची आवक झाली. दरात या आठवड्यात काहीशी सुधारणा झाली असून, गुरुवारी प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. आवक पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड आदी भागातून होत आहे. मागील महिन्याच्या मध्यात दरांवर दबाव होता. या आठवड्यात लिंबाची उचल बऱ्यापैकी झाल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर येथील शेती उत्पन्न बाजार समितीत लिंबाला क्विंटलला १००० ते १६०० रुपये दर मिळत आहे. लिंबाची चारशे ते ५०० पोती आवक होत आहे.