‘युती’चं जागावाटप हळूहळू उलगडत जाईल – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका स्पष्ट केली. भाजप आणि शिवसेनेत135 /135 असं जागावाटप असलं तरी घटक पक्षांना जागा द्यावा लागतील. ‘युती’चं जागावाटप हळूहळू उलगडत जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, मी परिपूर्ण आहे असं नाही. उपलब्ध असलेल्यांपैकी मी एक आहे, मी पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री झालंच पाहिजे असं काही नाही. मी कोरं पाकीट आहे, पक्षाचे नेते जो पत्ता पाकिटावर टाकतील तेथे तेथे मी जाईल. निवडणूक ही प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांची संयुक्त जबाबदारी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

चंद्रकांत दादांनी बारामतीला थेट आव्हान दिलं होतं त्यामुळे त्यांना त्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, आज बारामती विधानसभा जागा जिंकणं अशक्य आहे. यापुढच्या काळात बारामतीचं घर अधिक मजबूत करणार आहे. 2024 ची निवडणूक ही बारामतीसाठी असेल. EVM घोटाळा असता तर बारामती जिंकलो असतो असंही ते म्हणाले. ज्यांना EVM मशिन्सबाबत तक्रार करायची असेल त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं असा सल्लाही त्यांनी दिला.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

काही लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार?

विश्रांतीनंतर पावसाचा जोर उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार – हवामान विभाग

Loading...