नागपूरच्या कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू

नागपूरच्या कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू orange

नागपूरच्या कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना रसाळ संत्र्याची मेजवानी मिळणार आहे. आवकी सोबतच दरही आटोक्यात आहेत. कळमन्यात दर्जा आणि आकारानुसार प्रति टन १५ ते २० हजार रुपये भाव आहेत. पाऊस आणि उन्हामुळे यंदा संत्र्याला चांगलाच बहार आला आहे. सध्या जवळपास दररोज २०० टन टेम्पो बाजारात विक्री साठी येत आहे.

नाफेडचा तूर खरेदीस नकार; शेतकऱ्यांना दीड कोटीचा फटका बसणार

नागपुरी संत्र्याला तेलंगणा, कर्नाटक,मध्यप्रदेश, छत्तीसगड, येथून प्रचंड मागणी असते. शेतकऱ्यांकडून कमिशन घेऊ नये, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे असल्याने कमिशन टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडेचं संत्री घेण्यासाठी धाव घेतली आहे. त्यांनी जानेवारीपासूनच बगिच्यातून खरेदी सुरू केली आहे. हजारो टन संत्र्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी सुरू आहे.

डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर

मृग बहार संत्र्याची आवक काटोल, कोंढाळी, मोहपा, कळमेश्वर, सावनेर आणि लगतच्या परिसरातून सुरू आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी आहे. यावर्षी वातावरणाने चांगली साथ दिल्याने पिकाची प्रतवारी उत्तम आहे. उत्पादक शेतकऱ्यांना महाऑरेंजतर्फे संत्र्याच्या गुणवत्तेबाबत नियमित प्रशिक्षण देण्यात येत असल्यामुळे मृग संत्रा गोड असून गुणवत्ताही चांगली आहे. यावर्षी विदर्भात ४ लाखांपेक्षा जास्त टन संत्र्याचे उत्पादन होणार आहे.