औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाटाण्याचे सरासरी दर ‘हे’ होते

वटाणा

औरंगाबाद – वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. वाटण्याचे दाणे हवाबंद करून. गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या अख्या वाटाण्यांचा उपयोग भाजीसाठी करता येतो. वाटाण्यामध्ये कार्बो प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, मेग्निशियम हि खनिजे आणि अ, ब, व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.

तसेच आता म्हंटल्याप्रमाणे वाटाणा हे थंड हवामानातील पीक आहे. त्यामुळे आता हिवाळा असल्याने वाटण्याची आवक वाढली आहे. परंतु सुरुवातीला वाटाण्याचे दर हे खूप असतात. औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी म्हणजेच काल वाटाण्याची १२० क्विंंटल आवक झाली. १४०० ते २५०० रुपये प्रति क्विंंटलचा दर असलेल्या वाटाण्याचे दरम्यान दर मिळालेल्या वाटण्याचे सरासरी दर १९५० रुपये प्रतिक्विंंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

तसेच औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी ८३४ क्विंंटल आवक झालेल्या कांद्याचे सरासरी दर २१०० रुपये प्रति क्विंंटल तर १३८ क्विंंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी १७५० रुपये प्रतिक्विंंटल असा दर मिळाला.

त्यामध्येच पपईची आवक १५ क्विंंटल तर सरासरी दर ४५० रुपये प्रति क्विंंटल राहिले. तसेच पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ७८०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला सरासरी २२५ रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाला. त्यासोबतच पालकाला सरासरी दर २०० रुपये प्रति शेकडा राहिले तर कोथिंबिरीला सरासरी १५० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला.

महत्वाच्या बातम्या –