अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

अर्थसंकल्पात

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी  अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे .  यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे, तर या मध्ये  शेती क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी कृषी क्षेत्रासाठीही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे कि शेतमालावर प्रकिया क्षेत्राला प्रोस्तासहन देणार. देशांतर्गत तेल बियाणं उत्पादन वाढवणार, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार, आधुनिक काळातील शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल. रासायनिक मुक्त नैसर्गिक शेतीला देशभर चालना दिली जाईल, अश्या महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केल्या आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी शेतीसाठी काही घोषणा केल्या आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. तसेच 5 नदीजोड प्रकल्पाची ब्लू प्रिंट तयार करणार आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की यामध्ये  तापी नर्मदा, कृष्ण पेन्नार, गोदावरी कृष्णा, दमनगंगा नदी जोड प्रकल्प केला जाणार आहे. कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप प्रकल्पासाठी मोठी मदत केली जाणार आहे. तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर वाढवणार असल्याचे देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे कि शासनाकडून शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीवर शासनाचा भर असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्याचबरोबर तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे कि देशातील राज्य सरकारांना त्यांच्या अभ्यासक्रमात शेतीविषयक कोर्स समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, तसेच, झिरो बजेट शेतीचा समावेश करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगिटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढे सांगितले आहे कि शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य घेतले जाईल. कर्जासंबंधी घोषणा- नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासह आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले

महत्वाच्या बातम्या –