मोठी बातमी – ‘या’ देशामध्ये कोरोना लस घेतलेल्या 23 जणांचा मृत्यू

कोरोना लस

नॉर्वे – कोरोना लसीकरण सुरू झाले आणिजगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच काऊंट डाऊन सुरू झाल. गेल्या 2 महिन्यापासून जगातील अमेरिका, इंग्लंड, आणि आता आज पासून भारतात देखील कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. या सकारात्मक बातमीमुळे जगभरात आनंदाचं वातावरण आहे.

या दरम्यान एक वाईट बातमी समोर आली आहे. नॉर्वे या देशांमध्ये २६ डिसेंबरपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र नॉर्वे या देशामध्ये कोरोना वरील लस घेतल्यानंतर तब्बल २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश वृद्धांचा समावेश आहे.

नॉर्वेमध्ये तीस हजारांहून अधिक लोकांना ही लस देण्यात आली होती. तर आजच भारतात लसीकरण सुरू झाल्यानंतर ती बातमी आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर नॉर्वेमध्ये मृत्यू झालेल्यांपैकी 13 जणांचा मृत्यू हा कोरोना लस घेतल्यानेच झाल्याचं स्पष्ट झालं असून १० जणांच्या मृत्यूची चौकशी अद्याप अपूर्ण आहे. तर या घटनेत दरम्यान चीनच्या तज्ञांनी फायझर ची लस न वापरण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –