मोठी बातमी – राज्यातील कोरोनाच्या रिकव्हरी रेट मध्ये मोठी घट

कोरोना

औरंगाबाद – शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा गतीने पसरतो आहे. कोरोना संसर्ग वाढत असतांना महापालिका प्रशासनाने पाहिजे त्या प्रमाणात कोरोना चाचण्यांची गती वाढवलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे रूग्ण उशीराने समोर येत असून संसर्ग वाढण्यास खतपाणी मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यु होणारांचे प्रमाणही वाढताना दिसते आहे. रूग्णवाढ आणि मृत्युदरातही वाढ झालेली असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट देखील घटला आहे.

बावीस दिवसांपूर्वी कोरोनाचा शहराचा रिकव्हरी रेट हा ९५ ते ९६ टक्क्यांवर होता. मात्र ७ मार्च रोजी हे प्रमाण ८९.३३९ एवढे नोंदले गेले. तर काही दिवसांपूर्वी शून्यावर आलेला कोरोनाचा मृत्युदर हा आता २.५ वर पोहचला आहे. साधारणतः १४ फेब्रुवारीपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली.

तत्पूर्वी मागील दोन महिन्यांपासून कोरोना रूग्णांची रोजची संख्या ही केवळ ३० ते ४० रूग्णांच्या घरात होती. मात्र १५ फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या रूग्णवाढीने घेतलेली उसळी चिंताजनक बनली आहे.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवडाभरापासून शहरातच तिनशेपेक्षा अधिक रूग्ण निघत आहेत. यातच कुटूंबातील अधिकाधिक व्यक्‍ती पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण वाढले आहे.

या पार्श्वभूमीवर सध्या महानगरपालिकेचे जास्तीत जास्त कोविड सेंटर्स पुन्हा एकदा सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. अंशतः लॉकडाऊन आणि शनिवार रविवार कडक लॉकडाऊनच्या निर्णयामुळे रुग्णसंख्या कमी होण्यात फरक पडतो का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बतम्या –