मोठी बातमी – ‘या’ दिवशी मुंबईत अंबानी-अदानी विरोधात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

शेतकरी

मुंबई – केंद्र सरकार शेतकरी हिताविरोधात धोरण राबवित आहे.त्यावरून नवी दिल्लीत आंदोलन पेटले असतानाच आता 22 डिसेंबरला मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा अंबानी – अदानी विरोधात निघणार आहे.

राज्यमंत्री व शेतकरी नेते यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या मोर्चात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी,मंत्री बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील,हमाल पंचायतचे प्रमुख बाबा आढाव, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर व लोक संघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे सहभागी होत आहेत.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले कायदे रद्द करावे व खाजगी कंपन्यांच्या ताब्यात शेती जाणे थांबवावी.तसेच स्वामीनाथन आयोग लागु करून उत्पादन खर्च धरून 50 % नफ्यासह शेती पिकांचा हमी भाव जाहीर करावा या प्रमुख मागण्या आहेत. 22 डिसेंबरला दुपारी 12 वाजता मुंबईच्या बांद्रा येथील उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून हा मोर्चा निघणार असून तो बांद्रा – कुर्ला संकुलातील अंबानी यांच्या कार्पोरेट हाऊसवर धडकणार आहे.त्यामुळे आता सगळ्या देशाचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.

दरम्यान, संसदेनं मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे. या नव्या कायद्यांमुळे पिकांना मिळणारा हमीभाव सुरूच राहणार आहे; तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीही सुरूच राहील; हमी भाव आणि बाजार समित्या बंद होणार नाहीत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –