मोठी बातमी – ‘या’ शहरात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू

बंद

बारामती – राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. राज्यात १५ मे लॉकडाऊन लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवांसह जीवनावश्यक (किराणा, भाजीपाला आदी) वस्तूंच्या खरेदी साठी ठराविक काळात सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, बारामतीत येत्या बुधवारपासून (५ मे ) सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर बारामती प्रशासनाने निर्णय घेतला असून ५ मे ते ११ मे दरम्यान हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

दूध विक्री मर्यादित काळात तर किराणा, भाजीपाला…

मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. तर, दूध विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत मुभा असेल. यासोबतच, किराणा, भाजी मंडई या काळात बंद राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या –