मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

संचारबंदी

जळगाव : मागील काही दिवसांपासून कोरोना पुन्हा फास आवळताना दिसतोय. देशासह राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाल आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकार वेळीच पावले उचलत असल्याचे दिसत आहे. तर, स्थानिक प्रशासनाकडे देखील निर्बंध लावण्यासाठी महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्याची चर्चा आहे. राज्यात दररोज रुग्णांचा आलेख वाढत असल्याने कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. तर, राज्यात पुन्हा लॉकडाऊन होईल का ? याकडं सामान्यांचं लक्ष्य लागून आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाल्याने आता तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 11 मार्च रोजी रात्री 8 पासून ते 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान जनता कर्फ्यू लावण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बतम्या –