मोठी बातमी – कोरोना, डेल्टा, झिकानंतर आता ‘या’ व्हायरसचे संकट

कोरोना

नवी दिल्ली –  देशात कोरोना विषाणूच्या नव-नवीन व्हेरियंटमुळे बर्‍याच राज्यांची चिंता वाढली आहे . तर आता एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. त्यातच डेल्टा, झिका आणि झिका या व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच आता RS व्हायरसचे थैमान घातले आहे. नवजात बाळांनाही या व्हायरसने विळखा घातल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना, डेल्टा व्हेरिएंटनंतर आता अमेरिकेत RSV अर्थातच रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस आढळून आला आहे. त्यामुळे अगदी 2 आठवड्यांच्या नवजात बाळापासून ते 17 वर्षांच्या मुलांपर्यंत अनेकजण या व्हायरसच्या विळख्यात सापडत आहेत. अमेरिकेत आता डेल्टासोबतच RS व्हायरसबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला तर काय करायचं? हा प्रश्न आता तज्ज्ञांना सतावू लागला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीचा आधार घेत न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये जून महिन्यापासून अमेरिकेत RSV बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. जुलै महिन्यात या व्हायरस बाधित रुग्णांचा दर खूपच जास्त होता.

काय आहेत RS विषाणूची लक्षणं? चला तर जाणून घेऊ 

RSV ची बाधा झाल्यावर नाक वाहणं, खोकला येणं, शिंका येणं आणि ताप यासारखी लक्षणं दिसू शकतात. तसेच शून्य ते अगदी नवजात बालकांना कोरोना विषाणूची बाधा होतं आहे.

महत्वाच्या बातम्या –