मोठी बातमी – डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने राज्याच्या अनलॉक नियमावलीत बदल

डेल्टा प्लस

मुंबई – दुसरी लाट ओसरल्यानंतर महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेत. पण मागील दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यापाठोपाठ आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे देखील राज्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

डेल्टा प्लसचे रुग्ण काही जिल्ह्यांत आढळून आल्याने आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात ४ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. यामध्ये त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण विचारात घेऊन सर्वात कमी दर असणारे जिल्हे पहिल्या गटात यानुसार पाचव्या गटापर्यंत विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार, या प्रत्येक गटानुसार निर्बंध अधिकाधिक कठोर होत गेले. मात्र, आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत.

आज जारी करण्यात आलेल्या आदेशांनुसार जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी खालील उपाययोजनांवर भरे देण्यास सांगण्यात आलेय.

  • पात्र नागरिकांपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे, यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे
  • टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे
  • हवेमधून पसरू शकणाऱ्या करोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे
  • मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे
  • कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे
  • गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे

महत्वाच्या बातम्या –