मोठी बातमी – ‘या’ दिवशी शेतकऱ्यांची ‘भारत बंद’ची हाक

संचारबंदी

नवी दिल्ली – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला ८ दिवस पूर्ण झाले आहेत. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर अजूनही ठाण मांडून आहेत.

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलता आंदोलनाची ठिणगी आता देशभरात पसरली असून शेतकरी आपल्या हक्कांसाठी एकजुटीने आंदोलनाचा मार्ग अवलंबत आहेत. जर कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असतील तर त्याचं स्पष्टीकरण द्यावं अन्यथा आमच्या क्षेत्राबद्दल करण्यात आलेल्या कायद्यांबद्दल आम्हाला शिकवू नये, असा इशारा याआधीच शेतकरी नेत्यांनी दिला होता.

आता, काल विज्ञान भवनमध्ये शेतकरी आणि सरकारमध्ये तब्बल 7 तास चर्चा चालली. या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल. त्यामुळे सरकार नरमणार का? असा सवाल उपस्थित होत असतानाच काही वेळापूर्वी शेतकरी प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

त्यामुळे आता हा प्रश्न अधिक चिघळत असून केंद्र सरकार या उद्याच्या बैठकीमध्ये या कायद्याबाबत काही तडजोड करून बंद टाळणार की ८ तारखेला शेतकरी देशव्यापी बंद करणार याबाबत येणारे २ दिवस महत्वाचे आहेत.

महत्वाच्या बातम्या –