जालना – भोकरदन तालुक्यातील आन्वा हे गाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. तरीही येथे गेल्या काही दिवसांपासून नागरिक बिनधास्त फिरत होते तसेच कुठल्याच नियमांचं पालन करण्यात येत नव्हतं. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच थैमान सर्वत्र घातले आहे. आन्वा या गावात देखील कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात समोर येत होता. मात्र तरी देखील येथील नागरिकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसत होते. अखेर येथील प्रशासनाला जाग आली असून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आन्वा गावात धुमाकूळ घालण्यास सुरूवात झाली आहे. या गावात आतापर्यंत ६३ रुग्ण पॉझिटीव्ह निघाले आहे. कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायत ने कठोर पाऊल उचलण्यात सुरवात केली आहे. बुधवारी ग्रामपंचायतमधे झालेल्या बैठकीत पुढील पाच दिवस कडक जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकानासाठी सकाळी अकरापर्यंत व मेडिकल व दवाखाना पुर्ण वेळ सुरू राहणार आहे. या व्यतिरिक्त पुढील पाच दिवस गावातील पुर्ण दुकाने बंद राहणार आहे.
आन्वा येथील वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. येथील प्राथमिक आरोग्य दररोज आरटीपीसीआर तसेच अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे. तसेच जे कोरोनाबाधित रुग्ण घरी आयसोसोलेट झाले आहे. त्याना योग्य मार्गदर्शन करून उपचार घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- निवडलेली अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार – दादाजी भुसे
- ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांची संख्या ही हजारच्या घरात
- राज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात तर रिकव्हरी रेटमध्ये झाली मोठी वाढ
- रोज सकाळी फक्त दहा मिनिटे मारा दोरीवरच्या उड्या, जाणून घ्या फायदे
- ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात तब्ब्ल ‘इतक्या’ नव्या रुग्णांची वाढ