मोठी बातमी – आता मास्क न घालणाऱ्यांना मिळणार कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा

कोविड सेंटर

अहमदाबाद – जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना आजाराचे जगभरामध्ये असंख्य बळी ठरले आहेत. तर जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट देखील उसळली आहे. अद्याप या आजारावर लस देखील उपलब्ध झालेली नाही त्यामुळे सोशल डिस्टंसिंग का पालन करणारी मास्काचा वापर करणं अत्यंत गरजेचे आहे मात्र अद्याप देखील अनेकांना त्याचे गांभीर्य दिसून येत नाही त्यामुळे केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारांकडून लोकांना संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे. मात्र, लोकांकडून करोना नियमांची पायमल्ली होत असून, मास्क न लावताच लोक फिरताना दिसत आहेत.

या विषयावर चिंता व्यक्त करताना गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.विशाल अवतणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयानं राज्य सरकारला हे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती जे.बी. पर्दीवाला यांच्या खंठपीठाने हा निर्णय दिला आहे. जे नागरिक करोनाविषयी देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करत नाहीत, त्यांना कोविड सेंटरमध्ये सेवा करणे अनिवार्य करणारी आदेश काढण्यात यावे, असं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं.

जे लोक करोना नियमांचा भंग करत आहेत, त्यांना कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त १५ दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी. दिवसांतून चार ते पाच तास त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावं, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे.  सध्या देशात दिल्ली आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये कोरोनाने भीषण स्वरूप धारण केला आहे. त्यामुळे आता या शिक्षेच्या भीतीने तरी लोक नियमांचे पालन करणार का ? हे महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या –