मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्याच लसीकरणांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या हस्ते होणार

मोदी

औरंगाबाद – देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. बुधवारी कोरोनाच्या 64 हजार लसींचा साठा औरंगाबाद शहरात दाखल झाला. या साठ्याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तपासणी केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील काही लसीकरणांचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. त्यातील औरंगाबाद ग्रामीणमधील 8 आणि शहरातील 5 केंद्रांचा समावेश आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट मधून मंगळवारी लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागात रवाना झाले. पुण्याहून निघालेली वॅक्सिनची गाडी सकाळी औरंगाबादेत पोहोचली. जिल्हाधिकारी यांनी पाहणी केल्यानंतर लसींचासाठा जालना, हिंगोली, परभणी कडे पाठविण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या एकूण लसींच्या पुरवठ्यातून शहरासाठी २० हजार कोरोना लस प्राप्त झाल्या आहेत. यांचा साठा बन्सीलालनागर येथील पालिकेच्या व्हॅक्सीन कोल्डस्टोरेज येथे करण्यात आला आहे. शनिवारी १६ जानेवारीपासून प्राथमिक टप्प्यात शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची सुरुवात करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –