मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी 16 कलमी योजना, उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दीष्ट

निर्मला सीतारामन

‘शेतकऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा केली आहे. सरकारने कृषी विकास योजना राबविली, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत कोट्यावधी शेतकर्यांना लाभ झाला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उघडण्याची गरज आहे, जेणेकरुन त्यांचे उत्पन्न वाढेल,’ असे अर्थसंकल्पी भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

तसेच ‘शेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या अंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा संयंत्र दिलं जाईल. जी राज्ये केंद्र सरकारच्या कायद्यांचं मॉडेल स्वीकारतील त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. अन्नदाता उर्जादाता देखील आहे. पंतप्रधान कुसुम योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पाण्याच्या प्रश्नाशी झुंज देत असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाय योजना केल्या जातील. 2009-14 दरम्यान चलनवाढ 10.5% होती,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

याचप्रमाणे स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच किसान रेल योजना सुरू करून दूध, मांस, मासे वाहतूक करणे सुसह्य करणार अशी घोषणाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. असंही सीतारामन यांनी जाहीर केले. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी आम्ही 16 कलमी कार्यक्रम आणतो आहोत. ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती करणाऱ्यावर भर दिला जाईल. सौर उर्जेवर शेती पंप सुरु केले आहेत. आणखी 15 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.

महत्वाच्या बातम्या –

‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पाच कोटी एकसष्ट लाख शेतकऱ्यांना विमासंरक्षण’

‘मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून..’; ओमराजे निंबाळकर यांचे संसदेत मराठी भाषण

केंद्र सरकारने ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला – निर्मला सीतारामन

खरीप हंगाम २०१९ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ