मोठी बातमी – जिल्ह्यातील पाच दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय रद्द

बंद

बीड – जिल्ह्यात शनिवार ते बुधवार म्हणजेच ८ मे ते १२ मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मेडिकल वगळता इतर सर्व अत्यावश्यक आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला असून मंगळवारी आणि बुधवारी दुकाने सुरु राहणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने सलग पाच दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा आदेश अखेर मागे घेतला आहे. आता येत्या मंगळवारी आणि बुधवारी किराणा दुकाने, ड्रायफ्रूट, चिकन-मटणाची दुकाने आणि मिठाईची दुकाने सकाळी सात ते दहा या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. प्रशासनाने हा अचानक का बदल केला. याबद्दल नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करत आहेत.

बीड जिल्ह्यात शनिवार ते बुधवार म्हणजेच आठ ते बारा मेपर्यंत कडक लोकडाऊन करण्याचे आदेश शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप काढले होते. मेडिकल वगळता इतर सर्व अत्यावश्यक आस्थापना बंद ठेवण्यात येतील असे म्हटले होते. परंतु आता पुन्हा एक बदल झाला आहे. मंगळवार आणि बुधवारी म्हणजेच येत्या ११ आणि १२ तारखेला किराणा, ड्रायफ्रूट, मिठाई, चिकन मटनांची दुकाने सकाळी सात ते दहा या वेळेत सुरू राहतील, असे नवे आदेशात म्हटले आहे. तसेच दहा ते बारा या वेळेत बँकादेखील सुरू राहतील असे म्हटले आहे. परंतु, नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –