मोठी बातमी – संपूर्ण गावच निघाले कोरोना पॉझिटीव्ह

कोरोना

हिमाचल प्रदेश – लाहौल खोऱ्यातील एक संपूर्ण गावच करोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. थोरांग गावातील ५२ वर्षीय भूषण ठाकूर या एकमेव नागरिकाचा करोनाचा संसर्ग झालेला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाहौल-स्पिती हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक करोनाबाधितांचा जिल्हा ठरला आहे.

लाहौलमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत अचानक मोठ्या संख्येने वाढ झाल्याने स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना पर्यटकांना देण्यास बंदी घातली आहे. रोहतांग बोगद्याच्या उत्तरेकडील बाजूस हा सर्व प्रदेश आहे. गुरुवारपासून लाहौल खोऱ्यातील गावांमध्ये पर्यटकांना प्रवेेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बोगद्याच्या नंतरच्या प्रदेशात असणाऱ्या गावांमध्ये कोणत्याही पर्यटकास प्रवेश देण्यात येत नसून हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आली तर महाराष्ट्रातील सर्वांना महागात पडेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. महाराष्ट्रात दुसरी लाट येवू नये असं मला वाटतं पण मनाला भिती वाटते. मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत थोडी थोडी वाढ होतेय. महाराष्ट्रातल्या जनतेने केरळ आणि दिल्लीचा बोध घेतला पाहिजे, असं वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –