अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी ठोस तरतूद दिली गेली नाही – राजू शेट्टी

राजू शेट्टी

कोल्हापूर : देशभरात यावर्षीच्या साखर हंगामात मोठ्या प्रमाणात एफआरपीची रक्‍कम थकीत असताना साखरेचा हमीभाव वाढवणे किंवा थकीत एफआरपीसाठी कारखान्यांना सॉफ्ट लोन आजच्या अर्थसंकल्पात जाहीर होईल, अशी अपेक्षा फोल ठरली. देशातील हा दुसर्‍या क्रमांकांचा उद्योग असून पुन्हा अर्थसंकल्पात दुर्लक्षित राहिला आहे. यावर्षी साखर उद्योगासमोर खूप अडचणी आल्या आहेत. 

अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव दिले असे सांगितले जात असले तरीही मात्र शेतकऱ्यांसाठी हा एक फक्त बुडबुडा आहे. अर्थ संकल्पात साखर उद्योगासाठी ठोस तरतूद दिली गेली नाही. आपण फक्त योजना आखल्या म्हणजे शेती सुधारत नाही. सध्याच्या काळात शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्या वाढत आहे, पायाभुत सुविधांचा अभाव आहे, नवीन तंत्रज्ञान मिळत नाही, नवीन संशोधनाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. या गोष्टींकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेतीसाठी कसलीही भरीव तरतूद केली नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

ते म्हणाले, प्रत्यक्षात कृषीक्षेत्रासाठी 1 लाख 60 हजार कोटीची तर 1 लाख 23 हजार कोटी हे जलसंधारण ग्रामीण विकासासाठी केली. मात्र देशाचे आकारमान बघता आणि शेती क्षेत्राची झालेली फरपट बघता ही तरतूद खूप तुटपुंजी आहे.

महत्वाच्या बातम्या –

अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी ‘या’ महत्वाच्या घोषणा !

कांद्यावर पीएचडी करुन महिलेने मिळवली डॉक्टर पदवी

सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’

मुनगंटीवारांच्या पेटाऱ्यातून कृषीसाठी योजनांचा पाऊस, शेतकऱ्यांवर प्रभाव पडणारा राज्य अर्थसंकल्प(