मत्स्य उत्पादन आणि निर्यात वाढीसाठी केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मत्स्य उत्पादन आणि निर्यात

भारत हा कृषिप्रधान देश आहे. तथापि, ‘मर्यादित सिंचन’ हे या क्षेत्रातील महत्वाच्या आणि गंभीर अडचणींपैकी एक आहे, कारण भारतातील एकूण लागवडीखालील क्षेत्रांपैकी केवळ ३५% संपूर्ण सिंचन क्षेत्र आहे. शेतकर्‍यांच्या जमीनीमध्ये विविध कृषी योजना जसे की ‘राष्ट्रीय फलोत्पादन अभियान’, ‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना’, ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना’, मागेल त्याला शेततळे’ आणि जलयुक्त शिवार सारख्या योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये पाणी पातळीवर कोणताही प्रभाव न पाडता मत्स्यव्यवसायचा वापर करणे शक्य आहे. अलीकडच्या काळात शेततळ्यातील मत्स्यशेती हा चांगला जोडधंदा विकसित होत आहे.

मोठी बातमी – राज्यात लवकरच तलाठी भरती होणार

मत्स्य उत्पादन आणि निर्यात वाढीसाठी सरकारने काही नवीन पाऊले उचली आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह २१ राज्यांत राबविण्यात येणाऱ्या ‘पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचे’ उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. तसेच मत्स्य उत्पादन आणि निर्यात वाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० हजार ०५० कोटी रुपयांची पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेची घोषणा केली.

1 लाख 40 हजार रिक्त पदांसाठी रेल्वेकडून डिसेंबरमध्ये परीक्षा

तसेच यामध्ये समुद्री आणि देशांतर्गत मासेमारीतील लाभार्थीभिमुख उपक्रम राबविण्यासाठी १३ हजार ३४० कोटी देण्यात येणार आहे. ७ हजार ७१० कोटी रुपये मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधा निर्मितीसाठी देण्यात येणार आहेत.

केंद्र सरकार नवी योजना; शेती अवजारांसाठी देणार ८०% अनुदान, असा घ्या लाभ

तसेच यावेळी मोदींनी शेतकऱ्यांच्या पशुधनासंबंधीच्या समस्या सोडविण्यासाठी ई-गोपाला मोबाईल ॲपचे अनावरणही केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “२१ व्या शतकात आमची गावे आत्मनिर्भर भारताची ताकद, उर्जा बनावीत हीच कल्पना या योजनेमागे आहे.” यावेळी त्यांनी काही पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

मोठी बातमी – राज्यात लवकरच तलाठी भरती होणार