केंद्रीय पथकाने घेतला ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा

बुलडाणा – जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थिती आहे. वाढत्या रूग्णसंख्या व अनुषंगिक बाबींविषयी आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आज जिल्ह्यात दाखल झाले. कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा आज केंद्रीय पथकाने घेतला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने बैठक घेतली.

बैठकीला केंद्रीय पथकातील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. नवीन वर्मा, भुवनेश्वर आयुर्विज्ञान संस्थानमधील भूलतज्ज्ञ आंतर वैद्यकीय विभागातील सहा. प्राध्यापक डॉ दृष्टी सुंदरदास, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अति. आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे आदी उपस्थित होते. त्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांच्या कक्षात पुन्हा तालुकानिहाय कोरोना संसर्ग व उपाययोजनांचा आढावा घेतला.

बैठकीत केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्ह्यातील कोविड संसर्ग परिस्थिती, कोरोना मृत्यू दर, पॉझीटीव्हीटी दर, दररोज होत असलेल्या तपासण्या, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आदींची माहिती घेतली. तसेच कोविड नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी कोविड लसीकरणाची माहिती घेतली. दररोज होणारे लसीकरण आदींची माहिती घेतली. लसीकरण सेंटर, तेथे असणाऱ्या सुविधा, कोविड रूग्णालयांमधील बेड, ऑक्सीजन बेड, आयसीयु युनीट, व्हेंटीलेटर आदींचा आढावाही पथकाने घेतला. तसेच ऑक्सीजनचा पुरवठा, औषधांचा पुरवठा आदींचा आढावा घेवून कोविड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन, सामाजिक अंतर नियम, मास्क लावणे, गर्दी टाळे आदी नियमांच्या अंमलबजावणीसुद्धा माहिती पथकाने घेत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीची माहिती दिली.  बैठकीनंतर तालुक्यातील लसीकरण केंद्र, कोविड केअर सेंटर व शासकीय रूग्णालयांना पथकाने भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमावेत आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –