मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याची अजिबात काळजी नाही – सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत

मुंबई – रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलेलं आहे. या सरकारलाच कोरोना झाला असून सरकारमधील सर्व मंत्री क्वॉरंटाईन झालेत. यांना शेतकऱ्यांचे देणं-घेणं नसल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.

आज ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

साडेबाराशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार मुकं आणि बहिरं झालं आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्यांची काळजी नाही. मी मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याचा आरोप देखील सदाभाऊ खोत यांनी केला.
‘गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना दूधाचा दर कमी मिळत आहे. शेतकरी संघटनांकडून याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र शासन स्तरावर काही निर्णय होताना दिसत नाही. सरकार दूध उत्पादकांना लुटणारच असेल, तर आम्ही फुकट दूध द्यायला तयार आहोत. सरकारने येऊन घेऊन जावे. पण जर सरकार जागे झाले नाही तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल’ असा इशाराही खोत यांनी दिला.

पूर्वसूचना न देता मका खरेदी प्रक्रिया बंद

राज्य सरकारने सध्या राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. यामध्ये केवळ राजकीय स्वार्थ आहे. गावातील एका .योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी योग्य व्यक्तीची निवड करताना कोणत्या थर्मामीटरचा शोध लावला आहे, असा उपरोधीक टोलाही लगावला. सरकारने प्रशासकाची नियुक्ती न करता आहे त्याच सरपंचाना मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

आज ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता