चिकू महोत्सवाला सुमारे सव्वा लाख नागरिकांची उपस्थिती

पालघर येथे चिकू या फळाला स्थानिक उद्योजक तसेच स्वयंरोजगाराला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित केलेल्या चिकू महोत्सवाला सुमारे सव्वा लाख नागरिकांची उपस्थिती लाभली. यामुळे पालघर जिल्ह्यातील पर्यटनाला आता चालना मिळणार आहे. चिकूपासून तयार केलेले चिकू पावडर,खाद्यपदार्थ, मिष्टान्न व आईस्क्रीमची उपलब्धता होते. तर या महोत्सवात सुमारे २०० स्टॉल उभारण्यात आले होते.

नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील समस्या सोडविणार – मुख्यमंत्री

९० टक्के स्टॉलधारकांनी आपली वेगवेगळी उत्पादने या प्रदर्शनात मांडली होती.या महोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष होते. महोत्सवानिमित्त आयोजित चिकू दौड स्पर्धेमध्ये ६०० हून अधिक स्थानिकांचा व पर्यटकांचा सहभाग लाभला.आदिवासी संस्कृतीचे दर्शन तसेच आदिवासी समाज बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री, वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजनाचे कार्यक्रम या महोत्सवात आयोजित केले होते.

जाणून घ्या, सर्पदंश झाल्यावर काय करावे?

या कार्यक्रमात कागदाच्या लगद्यापासून वेगवेगळ्या कलाकृती बनवणारे जव्हार येथील भगवान कडू तसेच बोर्डी येथील महिला उद्योजिका सरला राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. चिकू महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारत पर्यटन पश्चिम विभागाचे संचालक वेंकटेश दत्तात्रेय यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले. या महोत्सवाला खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा तसेच इतर मान्यवरांनी भेट दिली.