औरंगाबाद – मराठवाडा पदवीधर मतदासंघाची निवडणूक जाहिर झाली असून त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकरी यांची व्हिडिओ कॉन्फरसव्दारे बैठक श्री.केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, उपायुक्त शिवाजी शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच व्हिडिओ कॉन्फरसव्दारे जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती.
निवडणूक कार्यक्रमानुसार दि. ५ नोव्हेंबर २०२० रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार असून दि. १२ नोव्हेंबर २०२० रोजी नामनिर्देंशन पत्र भरण्याची अंतिम तारीख राहील. दि. १३ नोव्हेंबर २०२० रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल. दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. दि. १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत मतदान होईल.
मतमोजणी ही दि. ३ डिसेंबर २०२० रोजी होईल. दि. ७ डिसेंबर २०२० रोजी निवडणुक प्रक्रीया संपेल असे सांगून श्री.केंद्रेकर म्हणाले की, अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी समन्वय ठेऊन लक्ष केंद्रीत करुन या ठिकाणी निवडणूक सुरळीत कशी पार पडेल याकरीता अधिक सजगतेने प्रयत्न करावेत तसेच निवडणूकीच्या यशस्वीतेसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना करत श्री.केंद्रेकर म्हणाले की, मतदान साहित्य लवकरच जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येईल. यावेळी व्हिडिओग्राफी, माध्यम समन्वय, ड्राय डे, मतमोजणी, मतदान केंद्राची यादी, सुक्ष्म निरीक्षकांचे केंद्र निहाय आदेश, जिल्हा निहाय आदेश, प्रशिक्षण, नामनिर्देशन छाननी, निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी, कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस यंत्रणेसोबत समन्वय ,आदी विविध विषयी सविस्तर आढावा घेत मागदर्शन केले.
कोरोनासंदर्भात नियमांचे तंतोतत पालन करा
निवडणूक प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक व्यकतीला मास्क वापरणे बंधनकारक आहे. निवडणूक कामासाठी वापरण्यात येणारा परिसर, खोल्यांच्या प्रवेशव्दारावर थर्मल स्कॅनिग, प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था, सामाजिक अंतर पाळणे यासह कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.अशा सूचना देखील संबधितांना श्री.केंद्रेकर यांनी यावेळी दिल्या.
महत्वाच्या बातम्या –
- लिंबूचे ‘हे’ पदार्थ वाढवतील रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या
- शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – वर्षा गायकवाड
- कांद्याच्या रसाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
- शिळा भात खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या