राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कमी होणार

थंडीचा कडाका

मुंबई – सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका (Cold snap) जाणवत आहे . उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्र्रात गारवा पसरल्याचे चित्र बघायला मिळताना दिसते. राज्यात अनेक भागात पाऊस झाला यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे,  तर आता यातच एक चांगली बातमी आहे कि राज्यातील काही भागांमध्ये थंडी कमी होणार आहे.

राज्यात काही भागांमध्ये ढगाळ हवामान आहे. तर राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडीचा कडाका (Cold snap) कमी झाला आहे. आज (ता.१८) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काल सोमवारी (ता. १७) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होते.

राज्यात काल सोमवारी गोंदिया जिल्ह्यात 11 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तर राज्यातील कोकण ,मध्य महाराष्ट्रात , सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर या भागनमध्ये थंडी कमी होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

देशातील राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालम या राज्यांमध्ये पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेसह धुके पडणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –