दोन दिवसांत थंडी परत येणार !

दोन दिवसांत थंडी परत येणार ! cold

रविवारपासून मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात घसरण नोंदविण्यात येईल. यात प्रामुख्याने मुंबई, नाशिक आणि पुण्याचा समावेश असेल. शनिवारी मुंबईत सर्वत्र सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण नोंदविण्यात येत असतानाच ढग, आभाळ विखुरलेल्या स्वरूपात नोंदविण्यात आले.

टॅटू काढताना अनेक गोष्टींची घ्या काळजी, योग्य काळजी घेतली नाही तर…..

राज्यात सर्वत्रच किमान तापमानात वाढ झालेली असताना येत्या दोन दिवसांत उत्तरेकडील वाऱ्यांच्या आगमनाबरोबर अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमनात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आठवडाभरात राज्यातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते, तर किमान तापमानात काही ठिकाणी वाढ होऊन २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

मुंबईसह कोकण विभागात सर्वच ठिकाणी तापमान घसरले

मध्य भारतात वाहणाऱ्या उत्तरेकडील वाऱ्यामुळे पुढील दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई-पुणे येथील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर २९ ते ३१ जानेवारीदरम्यान यात आणखीन घट होऊ शकते.काल राज्यात किमान तापमान १३ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान होते, तर कमाल तापमान २८ ते ३४ अंश दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ, तर कोकण आणि मराठवाडय़ात किंचित वाढ झाली. राज्यभरात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १२.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.