कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी कॉंग्रेसने केली होती, मात्र आता सरकारने केले संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

नवी दिल्ली – दिवाळीनंतर देशात कोरोनाचा संसर्गा पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. दिल्लीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्ये दिवसागणित वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतीविषयक कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी कॉंग्रेसने केली होती. मात्र आता सरकारने अधिवेशन स्थगित केल्याने नवा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे.

याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली आहे.ते म्हणाले,देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे आता जानेवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.
विरोधी पक्षांनी अधिवेशन लोकशाहीसाठी आवश्यक असून अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. कोरोना संकट, शेतकरी आंदोलन, कृषी कायदे, इंधनाचे वाढते दर या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक असून अधिवेशन झाल्यास ते सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –