राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर

राजेश टोपे

२१ लाखांहून अधिक झाल्या कोरोना चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोनाचे आज ७५४३ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार १५८ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के आहे. आज १०,३२० नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

आज निदान झालेले १०,३२० नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६५ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०८५ (५३), ठाणे- २३४ (१२), ठाणे मनपा-३१९ (१३),नवी मुंबई मनपा-४१२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३७६ (१३),उल्हासनगर मनपा-५० (९), भिवंडी निजामपूर मनपा-२७ (१) , मीरा भाईंदर मनपा-१४०(४),पालघर-१४१ (४), वसई-विरार मनपा-२०० (१), रायगड-२२७ (७), पनवेल मनपा-१५०(३), नाशिक-१३१, नाशिक मनपा-३१३ (५), मालेगाव मनपा-११ (१), अहमदनगर-१६४ (१),अहमदनगर मनपा-१५९, धुळे-९८ (१), धुळे मनपा-१०८, जळगाव-२५४ (३), जळगाव मनपा-१३४, नंदूरबार-४१, पुणे- ४५२ (१६), पुणे मनपा-१६३५ (३०), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (२५), सोलापूर-१६१ (६), सोलापूर मनपा-९५ (२), सातारा-१६८, कोल्हापूर-३४२ (६), कोल्हापूर मनपा-१४७ (४), सांगली-७३ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१८० (३), सिंधुदूर्ग-१०, रत्नागिरी-९ (१), औरंगाबाद-९८ (२), औरंगाबाद मनपा-६६ (२), जालना-२७ (१), हिंगोली-३, परभणी-४१ , परभणी मनपा-१४ (२), लातूर-६६ (१), लातूर मनपा-६२ (२), उस्मानाबाद-११३ (२), बीड-४० (१), नांदेड-७४ (५), नांदेड मनपा-९ (२), अकोला-३५, अकोला मनपा-२३ (१), अमरावती-८, अमरावती मनपा-४२ (१), यवतमाळ-८८, बुलढाणा-१०२ (६), वाशिम-२५, नागपूर-२१२ (१) , नागपूर मनपा-१२९ (२), वर्धा-१३, भंडारा-४, गोंदिया-१७, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-५, इतर राज्य २१.

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २१ लाख ३० हजार ९८ नमुन्यांपैकी ४ लाख २२ हजार ११८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८१ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९९ हजार ५५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ५३५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.

महत्वाच्या बातम्या –

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे- दादाजी भुसे




Loading…