धान्याला कीड लागू नये म्हणून ‘सेव्ह ग्रेन ‘बॅग ची निर्मिती !

पुणे : शेतकऱ्यांनी पोत्यात साठवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून ‘सेव्ह ग्रेन प्लास्टिक बॅग ‘ या आगळ्या वेगळ्या प्लास्टिक बॅग चे संशोधन पुण्यातील पनामा फाउंडेशन ने केले आहे. पनामा फाउंडेशन च्या सागर शहा यांनी हे संशोधन केले आहे . या संदर्भात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली .

देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर अवलंबून आहे. देशात दरवर्षी शेतकरी हा लाखो टन धान्य पिकवत असतो त्यातील हजारो टन वायाही जाते . त्याला अनेक कारणेही आहेत. त्यामुळे तो ते धान्य पोत्यामध्ये साठवतो प्रसंगी त्याला किड लागून शेतक-यांना तोटा सहन करावा लागतो. यावर पुण्यातील संशोधक सागर शहा यांनी उपाय काढलाय तो म्हणजे या धान्याला कोणतीही किड लागु नये यासाठी त्यांनी सेव्ह ग्रेन प्लँस्टिक बँगची निर्मिती केली. त्याला केंद्र सरकारच्या इंडियन इन्सिटयट आँफ फूड प्रोसेसिंगनेही मान्यता दिली आहे. राज्यात पहिल्यादांच त्यांनी हा प्रयोग केला आहे. पनामा फांऊडेशनच्या माध्यमातून सागर शहा यांनी हा शोध लावला असून शेतकरी, ग्राहक यांना याचा फायदा होणार आहे. ही पूर्णतः प्लँस्टिक बँग असून ५० किलोमध्ये ती उपलब्ध आहे. जपानचे तंत्रज्ञान त्यांनी ही बँग तयार करताना वापरले आहे. एथिलिन व्हिनाईल अल्कोहोल हे पाँलिमर असून कोणत्याही प्रकारचे गँसेस या पिशवीत येत नाही. त्यामुळे धान्याला किड लागत नाही .जर किडे असल्यास ते आतच मरतात.किंवा नव्याने कोणतीही किडे तयार होत नाही.

Loading...

याप्रकारच्या समस्येवर २०१२ पासून संशोधनाला सुरवात केली. शेतकरी,ग्राहक यांचे हित पाहता सध्या ही बँग ७० रुपयाला उपलब्ध आहे. पण शहा यांना जिथे धान्य पिकते अशा ग्रामीण भागात जाऊन शेतक-यांचे याबाबतीत प्रबोधन करणे आणि त्यांना किडीद्वारे साठवणुकीत होणाऱ्या नुकसानीपासून वाचवणे हा उद्देश आहे. ही बॅग टिकाऊ असून पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखी आहे.

Add Comment

Click here to post a comment
Loading…