पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारी धरणं भरली

वेबटीम : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारी धरणं भरली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिना संपत असताना भीमा खोऱ्यातील 16 धरणे 100 टक्के भरली आहेत तर 11 धरणं 95 टक्के भरत आली आहेत. यंदा भीमा आणि नीरा खोऱ्यावर चांगलाच मेहेरबान झालेला आहे. पुणे, सातारा, अहमदनगर जिल्ह्यांत पावसाने तुफानी हजेरी लावली आहे . त्यामुळे मागील पाच वर्षांचा विचार केला असता यंदा भीमा आणि नीरेच्या खोऱ्यातील सर्वच धरणे भरली आहेत.16धरणं हि शंभर टक्के भरली असल्याचं जलसंपदा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .

मागील वर्षीच्या तुलनेतही यंदा भीमा आणि नीरा खोऱ्यातील धरणांत दुप्पट जास्त पाणीसाठा झालेला आहे. पुणे व सातारा जिल्ह्यांतील 25 पैकी 16 धरणे 100 टक्के भरल्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता संपलेली आहे. मुळशी, चासकमान, डिंभे, भामा आसखेड, पवना, पानशेत ही मोठ्या क्षमतेची धरणे 100 टक्क भरलेली आहेत. तर 11 धरणं 95 टक्के भरली आहे त्या धरणांतून आतापासूनच पाणी सोडून देणे व या धरणांची पाणी साठवण क्षमता राखून ठेवणे गरजेचे आहे. उजनी धरण हे भीमेच्या खोऱ्यातील सर्वात मोठे धरण आहे. पावसाचा हाच सिलसिला सुरू राहिला तर महिन्याभरात किंवा उजनी धरण 100 टक्के पातळी ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या उजनी 85 टक्के भरलं आहे.

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलं आहे. काही धरणात 90 टक्के पाणी साठा जमा झाला आहे . भामा-आसखेड, वडिवळे पानशेत, पवना, नीरा देवघर, चासकमान, डिंभे, कळमोडी, कासारसाई, आंद्रा ही आठ धरणे यापूर्वी शंभर टक्के भरली होती. आता खडकवासला, भामा-आसखेड आणि वडिवळे ही धरणे शंभर टक्के भरली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.उजनी धरणाची पाणीपातळी वाढत चालली असून, सुमारे 85 टक्के धरण भरले आहे.

धरण – पाणीसाठा (टीएमसी) – टक्के

पानशेत १०.६५ – १००,

पवना ८.५१ – १००,

खडकवासला १.९७ – १००,

भामा आसखेड ७.६६ – १००,

कळमोडी १.५१ – १००

चासकमान ७.५७ – १००,

डिंभे १२.३३ – १००,

कासारसाई ०.५७ – १००,

नीरा देवघर ११.७३ – १००,

वडिवळे १.०७ – १००,

टेमघर १.६१ – ४४,

वरसगाव ११.९३ – ९३