लॉकडाऊनबाबतचा निर्णय दोन दिवसात घेणार – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता जनतेशी सवांद साधत होते. मुख्यमंत्री आज लॉकडाऊन करणार का ? असा प्रश्न आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला होता. यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या संबोधनाच्या सुरुवातीलाच घाबरू नका, मी तुम्हाला घाबरवायला नाही आलो नाही असे उद्गार काढले आहेत.

‘कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो होतो. परंतु अजूनही आपण कोरोनावर मात केलेली नाही. आपल्यला या कोरोनाच्या महामारीवर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करून जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका.

सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे. आपल्याला जनतेचे जीव वाचवायचे आहेत. मी आज सुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघणार आणि मग निर्णय घेणार आहे. आतापासून आपण ठरवूया. ही लाट रोखेलच पुढची लाटही रोखूया’, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या संबोधनात व्यक्त केले आहे.

मला नियम पळताना दृश्य स्वरूपात दिसलं नाही तर २ दिवसात पूर्ण लॉकडाऊन करणार, आता लावत नाही पण हा इशारा देतोय. तसेच मला दोन दिवसांत जर कोणतेही पर्याय नाही मिळाले तर दुर्दैवाने मला लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –