अलिबाग – तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे.
या दरम्यान जिल्ह्यातील आज दुपारी 2.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 1 हजार 886 घरांचे अंशत: नुकसान तर 5 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकूण 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.महावितरणच्या एकूण 65 HT पोलचे, 249 LT पोलचे तर एका ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण 69 कोविड रुग्णालयांपैकी 31 रुग्णालये थेट वीजपुरवठ्याद्वारे सुरु असून 38 कोविड रुग्णालये जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट
- राज्यात तब्बल ५९ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात तर रिकव्हरी रेटमध्ये झाली मोठी वाढ
- पेट्रोल, डिझेल सोबतच आता खतांच्या दरात वाढ! केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय – जयंत पाटील
- ‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या फायदे
- तोक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने ‘या’ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान