जिल्ह्यात गेल्या २४ तासात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची वाढ, तर कोरोना मृत्यूच्या आकडयात झाली मोठी घट

कोरोना

पुणे – कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.

तर, राज्य सरकारच्या नव्या निर्देशांनुसार पुण्यात काही निर्बंधांसह अनलॉकला ७ जूनपासून सुरुवात झाली आहे. अनलॉकच्या दिवशी पुण्यात दुसऱ्या लाटेतील नीचांकी(१७७) नव्या कोरोना बाधितांचा आकडा नोंदवला गेल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा नव्या कोरोना बाधितांचा आकडा हा २०० पार गेला आहे. आज कोरोनामुळे निधन झाल्याच्या आकड्यात घट झाल्याने हा काहीसा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे.

पुणे शहरात आज नव्याने २६१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, शहरातील ३३३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर, कोरोनाने १० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजारांच्या आत आली आहे. सध्या पुण्यात ३ हजार ४५७ सक्रिय रुग्ण असून ५३५ रुग्ण गंभीर तर ९८३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या –