गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या गर्दीचे परिणाम पुढील काही दिवसांत दिसण्याची शक्यता

ओमायक्रॉन

पुणे – सार्वजनिक गणेशोत्सवाची काल सांगता झाली असली तरी या उत्सवाच्या काळात झालेल्या गर्दीचे परिणाम पुढील काही दिवसांत दिसण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीनं पुढील 15 दिवस फार महत्वाचे ठरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे .

गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचंच दिलासादायक चित्र दिसून आलं असलं तरी चालू सप्ताहात रुग्णालयात भरती होणाऱ्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या प्रमाणात थोडीशी वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. गणेशोत्सव काळात बाहेरगावी गेलेले लोकही आता शहरात आपापल्या घराकडे पुन्हा परत येतील. त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यता आहे मात्र त्याचे नेमके प्रमाण कळल्यानंतरच धोका किती प्रमाणात आहे हे स्पष्ट होईल असं कोरोनाविषयक कृती पथकाच्या सदस्यांनी म्हटलं आहे.

आगामी 15 दिवस म्हणजे सर्वसाधारणपणे 4 ते 5 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी त्यादृष्टीने फार महत्वपूर्ण ठरणार असून या काळात नागरिकांनी सर्वाधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं मत या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे . स्थानिक प्रशासनाकडूनही या काळात चाचण्यांची संख्या वाढवली जाणार असून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –