सतत बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम

सतत बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम jwari pik

तीनही ऋतूमधील हिवाळ्यातील थंडी मानवी जीवनात व रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र मालेगाव तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी आणि त्यामुळे तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. बदललेले हवामान रब्बी पिकांसाठी चिंता वाढविणारे ठरत आहे. चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातीलपिके गहू, हरभरा व कांदा लागवडीत कमालीची वाढ झाली आहे.

कांदा झाला सव्वाशे पार; बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही दरात उतार नाही

पाणी टिकून राहील या आशेने मोठ्या प्रमाणावर पिकांची पेरणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. परंतु सध्या  हवामान सारखेच बदलत असून अधून मधून ढगाळ व दमट वातावरण असल्यामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. पावसाचे प्रमाण यंदा प्रथमच चांगले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या असून यामुळे रब्बी हंगामातील पिकांमध्ये कमालीची वाढ झाली.

कांदाच्या दरात चढउतार; शेतकरी झाले अस्वस्थ

खराब वातावरणामुळे कांद्याची रोपे खराब झाली होती, यामुळे शेतकऱ्यांनी इकडून तिकडून रोपे विकत घेऊन कांदा लागवड केली. कांदा, हरभरा या पिकांच्या समाधानकारक वाढीस थंडी पोषक असते. बरोबरच लागवड झालेल्या कांद्याचे मिळालेल्या थंडीतून अधिक जोमाने वाढ उत्तम पद्धतीने कांदा पोसला जातो. मात्र गेल्या काही दिवसात परिसरातून गायब झालेली थंडी, वातावरणातील बदल हा शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरविणारा आहे.