कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी – सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत

मुंबई – केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या निर्यातीवर जी बंदी घातली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये. तसेच कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी. अशी मागणी राज्याचे माजी राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

तसेच आज वडनेर येथे सरकारच्या निरायला निषेध म्हणून ‘कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे’, ‘शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो’  अशी घोषणाबाजी करत सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या आदेशाची होळी केली.

महत्वाच्या बातम्या –