शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळला

अमित शाह

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आंदोलक शेतकरी गाजियाबाद-दिल्ली सीमेवर पोहोचले आहेत.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा थेट परिणाम दिल्ली आणि आजूबाजूच्या जनजीवनावर झाल्याचं दिसून येतंय. शेतकऱ्यांचा हा पवित्रा लक्षात घेऊन केंद्र सरकार अखेर नरमलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत येण्यासाठी सीमेवर तळ ठोकून बसलेल्या  शेतकऱ्यांना आंदोलन संपवण्याचे आवाहन केले असून त्यांना चर्चेला येण्याचे आवाहन केले आहे. शाह यांनी म्हटले की, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यानंतर शेतकरी नेते ह्यांनी काल संध्याकाळी चार वाजता सिंधू बॉर्डरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

काल सकाळी पंजाबच्या ३० शेतकरी संघटनांची बैठक झाली. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर गृहसचिवांनी पाठवलेल्या पत्रात कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी रस्ते रिकामी करून बुराडी येथे येण्याची अट घालण्यात आली होती. शेतकऱ्यांनी ही अट फेटाळून लावली आहे. आमचा हेतू रस्ता अडवून जनतेला त्रस्त करण्याचा नाही आहे. शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अशा परिस्थिती सरकारने अटी घालून प्रस्ताव पाठवणे योग्य नाही असं स्वराज पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले .

महत्वाच्या बातम्या –