पाऊस धो-धो कोसळेल पण शेतकऱ्यांनी ‘ही’ काळजी नक्कीच घ्यावी !

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सरासरी 102 टक्के पावसाची शक्यता असून काही काळ पावसात खंड जाणवेल असा अंदाज कृषी हवामान शास्रज्ञ आणि अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. गेल्या काही वर्षातील हवामानाची स्थिती सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, आद्रता अशा विविध घटकांचा अभ्यास करून साबळे यांनी मान्सून मॉडेल विकसित केल आहे. राज्यभरातल्या विभागवार हवामान सेंटर वरून साबळे डेटा गोळा करून अंदाज व्यक्त करत असतात.

शेतीचा विचार करता यंदा पाऊस चांगला असला तरी शेतकऱ्यांनी चांगला ओलावा असल्याशिवाय पेरण्या करू नये असं साबळे यांनी सांगितलं आहे. तसेच राज्यातील सर्वच धरणं भरणार असल्याचा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला आहे. तर यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असल्याच साबळे म्हणाले.

कोणत्या पिकांवर द्यावा भर ?

शेतकऱ्यांनी कडधान्यं पेरणीवर भर द्यावा
आंतरपीक घेण्याकडे कल ठेवावा
कापूस पीक कमी करण्यावर भर असावा
बोन्ड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

मुंबईचा विचार केला तर गेल्या वर्षी मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला होता तशी स्थिती याही वर्षी होण्याची शक्यता असून जुलै किंवा ऑगस्ट मध्ये मुंबईत अशा प्रकारचा पाऊस होईल असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला आहे. यंदा पाऊस चांगला असला मान्सून कालावधीत सरासरी पेक्षा ज्यास्त पाऊस असला तरी जून जुलै आणि ऑगस्ट मध्ये पावसात खंड पडण्याचा अंदाज ही साबळे यांनी व्यक्त केला.

कुठे किती पडणार पाऊस ( आकडेवारी टक्क्यांमध्ये )

अकोला, वाशीम बुलढाणा सरासरीच्या 96 टक्के
नागपूर 100 टक्के,
यवतमाळ 105 टक्के
शिदेवाही चंद्रपूर सरासरीच्या 102 टक्के
परभणी 102 टक्के
दापोली 107
निफाड 106 टक्के
धुळे 103 टक्के
जळगाव 100 टक्के
कोल्हापूर 103 टक्के
पाडेगाव 100 टक्के
सोलापूर 100 टक्के
राहुरी 100 टक्के
पुणे 102 टक्के