‘या’ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केले राज्यातील पहिले ‘कोव्हीड केअर सेंटर’

परभणी – राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘कोव्हीड केअर सेंटर’ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याला प्रतिसाद देत परभणी जिल्ह्यातील मानवत इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने ८० बेडचे सर्व सोयींनी युक्त कोरोना केंद्र सुरू करण्यात आले आहे. असे करणारी ही राज्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे.

मानवत इथले कोव्हीड केअर सेंटर सुरू झाल्यामुळे परभणी आरोग्य विभागावर आलेला ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तहसील कार्यायल परिसरातील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ८० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर पाणी आणि भेजनाची व्यवस्था देखील बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

मानवत बाजार समितीच्या वतीने अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. राज्यातील इतर सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अशा प्रकारचे कोरोना केअर सेंटर सुरू करावे असे मत या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री नवाब मलिक यांनी ऑनलाईन हजेरी लावली.

महत्वाच्या बातम्या –