महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टनममध्ये दाखल

‘ऑक्सिजन एक्सप्रेस’

नवी दिल्ली – देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती तर आणखीच चिंताजनक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडत आहेत. काल नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे.

दरम्यान,अशा कठीण काळात महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. राज्याला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ चालवण्यात येत असून पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ गुरुवारी सकाळी विशाखापट्टनम स्थित स्टील प्लान्टला दाखल झाली. याद्वारे महाराष्ट्राला तातडीनं ऑक्सिजन पुरवण्यात येणार आहे.

१०० टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे महाराष्ट्राला पुरवण्यात येणार आहे. ‘राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लान्ट (RINL-VSP) मध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली. प्लान्टमध्ये सात रिकाम्या टँकरमध्ये ऑक्सिजन भरून ती महाराष्ट्राकडे रवाना करण्यात येणार आहे.

उद्या दुपारी ३.०० वाजेपर्यंत ही स्पेशल रेल्वे नागपुरात दाखल होऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रोटोकॉलनुसार, टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी, वजन करण्यासाठी तसेच सुरक्षेची खात्री करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी २०-२४ तास लागू शकतात. त्यानंतरच ही ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना होणार आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टनम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –