सीताफळाचा पहिला बहर सुरु, पुण्यातील मार्केटयार्डात पहिली आवाक !

सीताफळाचा पहिला बहर सुरु, पुण्यातील मार्केटयार्डात पहिली आवाक !

पुणे (मार्केटयार्ड) – आंब्याचा हंगाम नुकताच संपत आला असून पावसाच्या तोंडावरच सीताफळाचे(Custard apple) आगमन झाले आहे. ३१ रोजी मार्केटयार्ड मध्ये ७३ किलोची आवक झाली, बाजारात सध्या प्रति किलो ११० ते २११ रुपये भाव सुरु आहे. माघील वर्षी किलो ६० ते १२१ रुपये एवढा भाव मिळाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचे वर्ष सीताफळ बागायतदारांना चांगले असणार हे नक्की. मार्केट यार्डातील फळ विभागातील घुले तसेच बनवारी यांच्या फर्म वर हि आवक झाली असून प्रथमतः वडकी गावातून सीताफळ(Custard apple) आले आहेत.

जानेवारी पर्यंत सीताफळाचा(Custard apple) हंगाम राहणार असुन थोड्याच दिवसात हळू हळू आवक व किमतीत वाढ होणार आहे.

वडकी, पुरंदर, यवत, उरळी, कांचन, राजगुरूनगर, खेड, सातारा या भागातून मोठ्या प्रमाणात आवक होते. ह्या वर्षी सीताफळाला(Custard apple) चांगला भाव मिळणार असल्याचे समजते त्यामुळे शेतकरी बांधवाना दिलासा मिळणार आहे.

माघील वर्षी कोरोनाचे भीषण असे संकट जगभरात होते, त्यात उद्योग व्यापार बंद होते म्हणून सीताफळाला(Custard apple) मागणी नव्हती त्यात आईकसक्रीम पार्लर ज्यूस विक्रेते हि बंद असल्याने मोठे नुकसान झाले पण यंदा सर्व सुळळीत झाल्याने शेतकरी आनंदात आहे.

महत्वाच्या बातम्या –